Indian post office: केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभाग खात्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी विमा पाॅलिसी सुरु केली आहे. यासाठी नागरिकांना आपल्या जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क करावा लागणार आहे.
Health Policy आरोग्य विमा सेवा देणाऱ्या पाॅलिसीच्या किंमती सामान्यांच्या खिशाला आजही परवडत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन अगदी स्वस्तात मस्त आरोग्य विमा पाॅलिसी(Health Policy) पोस्ट खात्याने आणल्या आहेत. त्यासाठी पोस्ट विभागाने ‘टाटा एआयजी विमा कंपनी’ सोबत (Tata AIG Vima scheme) सामंजस्य करार केला आहे.
अवघ्या 299 व 399 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. वर्षभरात या योजनेचे विमा संरक्षण विमाधारकाला मिळेल. ही योजना 18 ते 65 वयाेगटातील नागरिकांसाठी आहे. प्रत्येक टपाल कार्यालयामार्फत (Post office) अटी-शर्तींसह ही योजना राबवली जात असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार मोहीम राबविण्यात येणार आहे.
पोस्टाचा स्वस्तात आरोग्य विमा : अवघ्या 299 व 399 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात ...
Letsupp Krushi
योजनेची वैशिष्ट्ये : Features of the scheme
- पोस्ट खात्याच्या या योजनेत फक्त 299 किंवा 399 रुपयांच्या हप्त्यामध्ये एका वर्षासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळणार आहे.
- विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास, अपंगत्व किंवा कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास 10 लाख रुपयांपर्यंत संरक्षण दिले जाईल.
- विमाधारकास रुग्णालयात दाखल केल्यास 60 हजार रुपयांपर्यंतचा खर्च, तसेच घरीच उपचार घेतल्यास 30 हजार रुपयांपर्यंत दावा करता येणार आहे.
- रुग्णालयाच्या खर्चासाठी 10 दिवसांसाठी रोज 1000 रुपये मिळतील.
- कुटुंबाच्या वाहतुकीसाठी 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्चही मिळणार आहे.
- विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अंतिम संस्कारासाठी 5 हजार रुपये, तसेच या विम्याअंतर्गत त्याच्या किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाणार आहे.
योजनेचा कालावधी : Scheme Period
पोस्टाच्या या योजनेचा कालावधी एक वर्षाचा आहे. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन विमा योजनेचे नूतनीकरण करता येणार आहे. विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत चालू खातं असणं आवश्यक आहे. नव्याने खाते सुरु करुनही योजनेचा लाभ घेता येईल.
299 व 399 च्या योजनेतील फरक जाणून घ्या
पोस्टाच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये विमाधारकाच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या दोन मुलांना शिक्षणासाठी 1 लाखांपर्यंत मदत मिळते. तसेच 10 दिवस रोज 1 हजार रुपये, 25 हजार रुपये वाहतूक खर्च व मृत्यूनंतर 5 हजार रुपये अंत्यसंस्कार खर्च मिळतात. मात्र, 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये हे सर्व खर्च मिळत नाहीत.

