खासदार संजय राऊत यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे. त्यांच्याविरोधात अजमीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. शिवडी न्यायालयाने हे वॉरंट काढलं आहे.
संजय राऊत यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी...
Letsupp Krushi
किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यास वारंवार गैरहजर राहिल्याने कोर्टाने हे वॉरंट बजावलं आहे. शिवडी दंडाधिकारी कोर्टाने ही कारवाई केली. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता २४ जानेवारीला होणार आहे.
"आज कोर्टात मेधा सोमय्या यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. संजय राऊत हे पूर्वी देखील या खटल्यामध्ये उपस्थित नव्हते हे आम्ही माननीय कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं आहे. त्यामुळे कोर्टाने आज संजय राऊत यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे त्यांना पुढच्या तारखेवेळी हजर राहावं लागणार आहे. जर हजर नाही राहिले तर कोर्ट आपले अधिकार वापरेल"

