योगींच्या मुंबई दौऱ्या वरून काँग्रेसची सरकारवर टीका

image

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई  मुंबई दौऱ्या वरून राज्यात  राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करणे हे भाजपाचे षडयंत्र आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

योगींच्या मुंबई दौऱ्या वरून काँग्रेसची सरकारवर टीका ...

Letsupp Krushi

नाना पटोले म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे. योगी आदित्यनाथ यांचे सरकार स्वतःच न्यायालय व न्यायाधीश असल्याच्या अविर्भावात बुलडोझर चालवून गोरगरिब व सामान्य माणसांची घरे जमीनदोस्त करते. महिला, अल्पसंख्याक, दलित समाज योगींच्या राज्यात सुरक्षित नाही, ते भयभित होऊन जीवन जगत आहेत. योगी आदित्यनाथ हे धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करतात आणि ज्या राज्यात धर्माच्या नावावर राजकारण केले जाते व सरकार चालवले जाते त्या राज्यात कोणता उद्योगपती गुंतवणूक करण्यास धजावेल? असा सवाल त्यांनी केला. मात्र, महाराष्ट्रातील ईडी सरकारच्या मदतीने उत्तर प्रदेशात गुंतवणूक वाढावी यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला.

गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भाजपाशासित राज्यातील गुंतवणूक वाढावी व महाराष्ट्राचे महत्व कमी व्हावे यासाठीच महाविकास आघाडीचे सरकार पाडून ईडीचे सरकार आणले असावे असे वाटते, असा संशयही पटोले यांनी व्यक्त केला. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यावरून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी ईडी सरकार पायघड्या घालत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.

Agronext