राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द झाला आहे. दौरा रद्द करण्यामागचे कारण उद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुंबईत अचानक महत्त्वाचं काम आल्याने दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कोल्हापूर दौरा रद्द...
Letsupp Krushi
मुख्यमंत्री शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार होते. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता दरे, (जि. सातारा) या त्यांच्या मुळगावी जाणार होते.
असे सांगण्यात येत आहे की मुख्यमंत्री शिंदे पुढच्या आठवड्यात कोल्हापूर दौरा करू शकतात. परंतु या बाबत अशी काही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुख्यमंत्री शिंदे सध्या मुबंईत आपल्या कामात व्यस्त आहेत.

