सभासदांचे संघटन
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक कंपनीने ५०० हून अधिक सभासदांचे संघटन उभारले. सेंद्रिय शेतीपासून ते विपणन व्यवस्था, मूल्यवर्धन, प्रक्रिया व विक्री अशी साखळीच कंपनीने उभारली आहे. ‘सात्त्विक कृषिधन’ ब्रँडद्वारे नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारपेठेत सादर केली आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत सेवामार्ग येथे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिशास्त्र विभाग कार्यरत आहे. या माध्यमातून रासायनिक अवशेषमुक्त शेतीचे प्रयोग सुरू आहेत. हाच विचार घेऊन शेतकऱ्यांचे संघटन उभे करून सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘दिंडोरी प्रणीत शेतकरी उत्पादक कंपनी’ची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य यांच्यासह आरोग्यप्रधान प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठ उपलब्ध केली आहे. कंपनीचे अध्यक्ष गिरीश (आबासाहेब) मोरे यांना कंपनीच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागला. त्या वेळी तृणधान्ये, कडधान्ये मिळून अवघी सात उत्पादने होती. सुरुवातीपासून नावीन्यपूर्ण संकल्पना, धोरणात्मक कामकाज, सूत्रबद्धता व विश्वसनीय व्यवस्था यावर भर दिला.
कार्यपद्धती
शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी प्रशिक्षणे, चर्चासत्रे, अभ्यास दौरे यांचे आयोजन केले. बाजारपेठेतील मागणीनुसार पीकनिवड, हंगामनिहाय लागवड, कीड- रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात येते. शेतकऱ्यांकडील मालाची विक्री होते. तंत्रज्ञान विस्तारही साधला जात आहे. दिंडोरी, नाशिक, निफाड, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर भागातील सहभागी शेतकऱ्यांच्या विकासाचा आलेख त्यातून वाढत आहे.
सेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन’ ब्रँड...
Letsupp Krushi
‘सात्त्विक कृषीधन’ ब्रँडने मिळविली बाजारपेठ
व्यावसायिक संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर कंपनीने ‘सात्त्विक कृषिधन’ हा ब्रँड विकसित केला. उत्पादनांच्या गुणवत्तेची हमी, आकर्षक पॅकिंग, अन्नसुरक्षा, प्रमाणीकरण आदी बाबी त्यात समाविष्ट केल्या. अपेडा, राष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा यांचे प्रमाणीकरण घेतले. मैदा, प्रिझरर्व्हेटिव, कृत्रिम रंग वा स्वादयुक्त घटक न वापरता उत्पादनांची निर्मिती होते. पॅकिंगसाठीही पर्यावरणपूरक घटकाचा वापर होतो.
कंपनीच्या कामकाजाची वैशिष्ट्ये
‘सात्त्विक कृषिधन’ची उत्पादने
नावीन्यपूर्ण उत्पादने
विक्री व्यवस्था
उलाढाल (रुपये)
आरोग्याच्या दृष्टीने शेतीमाल उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून संधी निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या कष्टाला प्रतिष्ठा मिळवून देणे हा कंपनी स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात राज्यभर कामाचा विस्तार करताना यंत्रणा उभारली जात आहे. कामांचे विकेंद्रीकरण करून स्थानिक पातळीवर संधी निर्माण करण्याचा मानस आहे.
- गिरीश (आबासाहेब) मोरे
(अध्यक्ष, दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक कंपनी.)
संपर्क - राहुल वाघ, ७२१९६५०४८६
शेतकरी उत्पादक कंपनी.